चौकशी पूर्ण करून खडसे यांना मंत्रीमंडळात घ्या
By admin | Published: June 20, 2016 12:23 AM
जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुणे येथील जमीन खरेदी प्रकरण तसेच दाऊद इब्राहिम याच्या पत्नीच्या मोबाईलवरून कॉल प्रकरणी आरोप झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या संदर्भातील चौकशी तत्काळ पूर्ण करून त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान द्यावे अशी मागणी भारतीय लोकशाही पार्टीचे अध्यक्ष शेख असलम यांनी पत्रकार परिषदेत केली. शासकीय विश्रामगृहावर रविवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेस महासचिव कैलास शेळके, शाहिद शेख, कलीम पायलट, शेख सत्तार उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील यापूर्वी आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही.