नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांचे एकमत असेल तर निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिकांचा वापर सुरू करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो, असे भाजपाने म्हटले. काँग्रेसने त्यांच्या महाअधिवेशनात ठराव करून अशी मागणी केल्यानंतर भाजपाने ही बदलेली भूमिका व्यक्त केली आहे.भाजपाचे सरसिटणीस राम माधव म्हणाले की, मतपत्रिकांऐवजी मतदानयंत्र वापरण्याची सुरुवातही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीनंतरच झाली होती. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष सहमत असतील तर पन्हा कागदी मतपत्रिका वापरण्यावर विचार केला जाऊ शकेल.निवडणुकांपूर्वी मतदानयंत्रांमध्ये छेडछाड केली जाते, अशा तक्रारी अनेक पक्षांनी केली होती.
काँग्रेसच्या ठरावानंतर भाजपातही ‘मत’परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:02 AM