नवी दिल्ली: कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्स व्हायरसनंतर आता टोमॅटो फ्लूचा धोका वाढला आहे. भारतात टोमॅटो फ्लूची 80 संभाव्य प्रकरणे आढळून आली आहेत. यात मुलांच्या शरीरावर लाल रंघाची फोड तयार होतात. 'द सन'मधील रिपोर्टनुसार, टोमॅटो फ्लूचे नाव शरीरावर येणाऱ्या लाल रंगाच्या फोडांवरुन ठेवण्यात आले आहे. या लाल रंगाच्या फोडांचा आकार हळुहळू टोमॅटोसारखा वाढतो. टोमॅटो फ्लूमुळे त्वचेवर पुरळ उठतात, ज्यामुळे रुग्णाच्या त्वचेवर जळजळ होण्याची तक्रार करतात.
या टोमॅटो फ्लूच्या लक्षणांमध्ये थकवा, मळमळ, उलट्या, अतिसार, ताप, तहान लागणे, सांधे सूज, शरीर दुखणे आणि सामान्य इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे आहेत. डॉक्टरांनी फोडांच्या पुरळांची तुलना मंकीपॉक्सशी आणि तापाची तुलना डेंग्यू, चिकनगुनिया आजाराशी केली आहे. शरीरावर ही लक्षणे कशामुळे दिसतात हे शोधण्याचा संशोधक अजूनही प्रयत्न करत आहेत.
आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, 2022 च्या मे ते जुलै दरम्यान 82 प्रकरणे नोंदवली आहेत. ही सर्व पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळले आहेत. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर तो संपूर्ण प्रदेशात पसरला. टोमॅटो फ्लूचा आतापर्यंत कोणताही पुरावा नाही की हा रोग गंभीर किंवा जीवघेणा आहे. यात मुलांवर नेहमीच्या उपचाराने उपचार केले जात आहेत.