अमृतसर : अमृतसरमध्ये दसऱ्याला झालेल्या दुर्घटनेनंतर पटरीवर आंदोलन करणा-या आंदोलकांना हटविण्यात आले आहे. त्यामुळे ४० तासांनंतर रेल्वे सेवा सुरू झाली आहे.उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी सांगितले की, दुपारी १२.३० वाजता रेल्वे सुरू करण्यास मंजुरी मिळाली. पहिली मालगाडी दुपारी २.१६ वाजता अमृतसरला रवाना करण्यात आली. त्यानंतर एक्स्प्रेस रेल्वेंची ये-जा सुरूझाली. फिरोजपूर मंडळाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त एस. सुधाकर यांनी सांगितले की, अपघात झालेल्या पटरीवरून रेल्वे सेवा पुन्हा सुरूझाली आहे. दरम्यान, पटरीवरून हटविण्यात आल्यानंतर संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे सुरक्षा कर्मचाºयांसोबत त्यांची झटापट झाली.>सिद्धंूच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणीपोलीस अधिकाºयांनी सांगितले की, दगडफेकीत पंजाब पोलिसांचा एक कमांडो आणि एक फोटोग्राफर जखमी झाला आहे. आंदोलकांनी यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंजाबचे मंत्री नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करीत होते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पंजाब पोलिसांनी कर्मचारी तैनात केले होते.
दुर्घटनेनंतर अमृतसरहून रेल्वेसेवा झाली सुरू, पटरीवरील आंदोलकांना हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:30 AM