अहमदाबाद - गुजरातच्या सरकारी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अहमदाबाद सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा या घटनेनंतर उजेडात आला आहे. रुग्णालयाकडून नातवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आला होता, संबंधित मृतदेह हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, मृतदेह पीपीई कीटच्या आवरणाने झाकून नातेवाईकांकडे दिला गेला. नातेवाईकांनीही जड अंतकरणाने या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. संबंधित रुग्ण कोविड पॉझिटीव्ह असल्याने सर्व खबरदारी घेत आणि शासकीय नियमांचे पालन करुन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, त्यानंतर रुग्णालयातून फोन आला आणि सर्वच नातेवाईकांना धक्काच बसला.
द हिंदू वर्तमानपत्राचे पत्रकार महेश लांगा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक माहिती शेअर केली. ती माहिती अभिसार शर्मा यांनीही शेअर करत, गुजरातमधील वृत्तवाहिनीचा व्हिडिओही शेअर केला आहे. आता, एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी अभिसार शर्मा यांचे हे ट्विट रिट्टिट केले आहे.
कोरोना संकटाच्या काळातील रुग्णालयात रुग्णांची आणि नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. गुजरातमधील रुग्णालये ह प्रातनिधिक असले तरी, मुंबईतील एका रुग्णालयातही कोरोना रुग्णांच्याजवळ मृतदेह ठेवण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले होते. त्यानंतर, अहमदाबादमधील सिव्हील रुग्णालयाती हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे.