शेखपुरा/ बछवाडा (बिहार) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढत असतानाच बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेखपुरा व बछवाडा येथील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर उपरोधिक टीका केली. सरकारवर ‘सुटा-बुटातील सरकार’ अशी टीका झाल्यानंतर पंतप्रधानांनी सूट घालणे सोडून दिले आहे, असा चिमटा त्यांनी काढला.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी जनतेला वारेमाप आश्वासने दिली; पण सत्तेत येताच त्यांना या आश्वासनांचा विसर पडला. पंतप्रधानांच्या सेल्फी छंदावरही राहुल यांनी तोंडसुख घेतले. पंतप्रधानांच्या कुठल्याही छायाचित्रात शेतकरी, मजूर किंवा गरीब दिसत नाही. त्यांच्यासोबत दिसतात ते केवळ गुगल, फेसबुक, यू ट्यूबचे, अमेरिकेचे बडे बडे उद्योगपती. मोदी वारंवार विदेश दौऱ्यावर जातात. पण येथील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत त्यांना एक दिवस घालवावा वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (वृत्तसंस्था)ते १६ वेळा कपडे बदलतातपंतप्रधान अमेरिकेत जातात तेव्हा दिवसातून १६ वेळा कपडे बदलतात. तुम्ही नितीश कुमार यांना कधी सुटात पाहिले आहे का? असा सवाल करीत, पंतप्रधानांना केवळ कपड्यांची चिंता आहे. गरीब, उपेक्षितांची, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, असा आरोपही त्यांनी केला.
टीकेनंतरच मोदींनी सूट वापरणे सोडले
By admin | Published: October 08, 2015 4:53 AM