जम्मू : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ सर्जिकल स्ट्राइक्सद्वारे उद्ध्वस्त केल्याने जगभर नाचक्की झालेल्या पाकिस्तानची खुमखुमी मात्र संपलेली नाही. अजूनही कागाळ्या करणे सुरूच आहे. पाकमधील दहशतवाद्यांनी रविवारी रात्री बारामुल्ला येथील ४६ राष्ट्रीय रायफल्स आणि त्याशेजारील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर हल्ला केल्यानंतर सोमवारी पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सर्जिकल स्ट्राइकनंतर आतापर्यंत पाकिस्तानने १0 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा सुरू होत असतानाच, पाकिस्तानने आज पुन्हा भारतातील लष्कराच्या चौक्या आणि रहिवासी भागांत गोळीबार केला. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक जखमी झाले. अर्थात भारतीय सैन्याने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करून, पाकिस्तानला चोख उत्तर दिले.
दोन देशांतील तणाव संपावा, अशी आमची इच्छा असल्याचे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी इस्लामाबादमध्ये स्पष्ट केले. पण त्याच वेळी पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर गोळीबार करीत होते.पाच रायफली पळवल्या दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील सामनू गावात असलेल्या पोलीस चौकीवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पाच सेल्फ लोडिंग रायफली म्हणजे एसएलआर पळवून नेल्या. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली असून, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. - संबंधित वृत्त/देश-परदेशपाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील शाहपूर, कृष्णाघाटी, मंडी आणि सब्जिया सेक्टरमधील ताबारेषेलगतच्या आघाडीवरील चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला. पाक लष्कराने दुपारी पावणेदोन वाजता मंडी आणि सब्जिया सेक्टरमध्ये कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार सुरू केला, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल मनीष मेहता यांनी दिली. त्यांनी १२० मि.मी. आणि ८० मि.मी.च्या तोफगोळ्यांचा मारा केला. सीमेवर चकमक सुरू आहे, असेही ते म्हणाले.रशिया भारताच्या पाठीशी उरी हल्ला करणारे हल्लेखोर पाकमधून आले होते, हे रशियाने याआधीही स्पष्टपणे सांगितले आहे, असे नमूद करून कदाकिन यांनी पाकला दहशतवाद थांबविण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले. यासंदर्भात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा ‘पी-५’ गटातील रशिया पहिला देश आहे.
प्रत्येक देशाला स्वत:चे संरक्षण करण्याचा हक्क आहे, असे नमूद करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने तेथील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे सोमवारी पूर्णपणे समर्थन केले.
रशियाचे भारतातील राजदूत अॅलेक्झांडर कदाकिन म्हणाले, ‘दहशतवाद्यांनी भारतात घुसून लष्करी तळांवर हल्ले करणे हे मानवी हक्कांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे. म्हणूनच (आम्ही) ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे समर्थन करतो. प्रत्येक देशास स्वत:चे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे.पुंछ सेक्टरमधील शाहपूर, कृष्णगटी, मंडी व सब्जीआन येथे पाक सैनिकांचा गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा.शाहपूर येथे पाच नागरिक जखमी. काही दुकानांना आग. भारतीय प्रतिहल्ल्यात सीमेवरील पाकची ‘टिष्ट्ववेन १’ ही चौकी उद््ध्वस्त. पुंछ येथील मिनी सेक्रेटरिएट इमारतीत झालेल्या हातबॉम्ब स्फोटात एक जखमी.