बलवंत तक्षक गुरगाव/नवी दिल्ली : गुरगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट या खासगी रुग्णालयाने डेंग्यूने दगावलेल्या मुलीच्या (सात वर्षे) कुटुंबाला जवळपास १६ लाख रुपयांचे बिल आकारल्याच्या घटनेबद्दल मी अहवाल मागवला आहे. तो पाहून त्यानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी सांगितले.त्या मुलीचा मृत्यू गेल्या सप्टेंबरमध्ये झाला होता. हे हॉस्पिटल मल्टीसुपर स्पेशालिटी आहे. मृत मुलीच्या पालकांच्या मित्राने हॉस्पिटलविरोधात टिष्ट्वटरवर केलेल्या आरोपांची मी नोंद घेतली, असे नड्डा यांनी सांगितले. ती मुलगी हॉस्पिटलमध्ये १५ दिवस होती आणि तिच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने १५.७९ लाख रुपये बिल आकारल्याचे निवेदनात म्हटले होते.>चौकशी कराफोर्टिस हॉस्पिटलवरील आरोपांची तातडीने चौकशी करण्यात यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरयाना सरकारला सांगितले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान म्हणाल्या की, हॉस्पिटलविरोधात केलेल्या कृतीचा अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्यास हरयानाच्या आरोग्य सचिवांना सांगण्यात आले आहे.
मुलीच्या मृत्यूनंतर फोर्टिसने आकारले १६ लाखांचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:56 AM