हरिद्वार: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic2020) च्या सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाच्या पराभवानंतरही खेळाडूंनी केलेल्या खेळीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण, यादरम्यान एक धक्कादायक घटना घडलीये. पराभवानंतर संघातील खेळाडू वंदना कटारियाच्या घराबाहेर गावातील काही लोकांनी फटाखे फोडले असून, कुटुंबियांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यापूर्व सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने इतिहाच रचला, पण उपांत्य सामन्यात भारताला अर्जेंटीनाकडून पराभवाचा सामना करावा लागला. परभवानंतरही खेळाडूंच्या खेळीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण, उत्तराखंडमध्ये संघातील खेळाडून वंदना कटारियाच्या घराबाहेर गावातील काही लोकांनी फटाखे फोडत कुटुंबियांना जातीवरुन शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी वंदनाचा भाऊ शेखर कटारियाने पोलिसांत तक्रार दिली असून, हरिद्वारचे एसएसपी कृष्णराज यांनी भा.दं.वि. कलम 504 आणि एससी/एसटी अॅक्ट कलम 3 अंतर्गत खटला दाखल करुन चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेमंक काय घडलं ?
वंदनाचा भाऊ शेखरने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितल्यानुसार, 'सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी संघाच्या पराभवानंतर गावातील काही उच्चवर्णीयांनी त्यांच्या घराबाहेर फटाखे फोडत आनंदोत्सव साजरा केला. तसेच, कटारिया यांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच, हॉकी संघात दलित खेळाडूंची संख्या जास्त झाल्यामुळे भारताचा पराभव झाला, अशी खालच्या शब्दातील टीका केली.