सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 09:33 AM2019-05-30T09:33:29+5:302019-05-30T09:33:49+5:30

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ही माहिती ट्विटरवर दिली आहे.

After the defeate of Congress, will not participate debate show on the news channels | सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार

सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार

Next

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष कारणमिमासा करत आहे. यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला असून पुढील एक महिन्यापर्यंत काँग्रेसचा कोणीही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील चर्चांना उपस्थित राहणार नाही. 


काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ही माहिती ट्विटरवर दिली आहे. तसेच वृत्तवाहिन्यांनाही त्यांनी विनंती केली आहे. काँग्रसे पक्षाने निर्णय घेतला आहे की, वृत्तवाहिन्यांवरील कोणत्याही चर्चेला एक महिना प्रवक्त्यांना पाठिवण्यात येणार नाही. सर्व वृत्त वाहिन्या आणि संपादकांना विनंती आहे की काँग्रेसच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्रमाला बोलावू नये. 



गेल्या शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला होता. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मीडिया चॅनेल्सवर होणाऱ्या डिबेटमध्ये जाणे बंद करावे. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी समाजवादी पक्षाने अशा प्रवक्त्यांना हटविले होते. 
 

Web Title: After the defeate of Congress, will not participate debate show on the news channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.