शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; जमीन घोटाळ्यात ईडीने बजावले होते समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 4:28 PM

झारखंडमध्ये ईडीची नोटीस मिळाल्यानंतर एका व्यापाऱ्याने टोकाचं पाऊल उचल्याचे समोर आलं आहे.

ED Action : गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ईडीच्या कारवाईमुळे अनेकांना तुरुंगवास देखील भोगावा लागत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्यासाठी ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जातेय असा आरोप विरोधकांकडून होतोय. दुसरीकडे सरकार आणि ईडी कारवाईचा काहीही संबंध नसल्याचा दावा सत्ताधारी पक्ष केला जातोय. अशातच झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंडमध्ये ईडीची नोटीस आल्यानंतर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

झारखंडमध्ये सध्या ईडीच्या सुरु असलेल्या बेधडक कारवायांना एका व्यापाऱ्याच्या आत्महत्येसोबत जोडलं जात आहे. रांचीमध्ये एका जमीन व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर व्यापारी तणावाखाली होता असे म्हटलं जात आहे. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

रांचीच्या लालपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. कृष्णकांत नावाच्या जमीन व्यापाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.गळफास घेतल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ कृष्णकांत यांना ऑर्किड रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मृत कृष्णकांत यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीस पाठवली होती. ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. नोटीस मिळाल्यानंतर कृष्णकांत तणावाखाली होते. मात्र, आत्महत्येमागे ईडीची नोटीसच कारणीभूत आहे की नाही, हे समोर आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जून २०२२ मध्ये, रांचीमधील बरैतू पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. यामध्ये प्रदीप बागची नावाच्या व्यक्तीला मुख्य आरोपी करण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतीय लष्कराची मालमत्ता हडप केल्याचा आरोप प्रदीपवर होता. ईडीने या प्रकरणाची चौकशी केली असता, ही ४.५ एकर जमीन बीएम लक्ष्मण राव यांची असल्याचे समोर आले, ज्यांनी ती स्वातंत्र्यानंतर लष्कराच्या ताब्यात दिली होती. याच जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात कृष्णप्रकाश यांना ईडीने नोटीस बजावली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड