नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदार संघातून विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच यूपीए अध्यक्ष आणि खासदार सोनिया गांधी यांनी बुधवारी आपला मतदारसंघ असलेल्या रायबरेली येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.
फुरसतगंज एयरपोर्ट वरून खाजगी वाहनाने सोनिया आणि प्रियांका ह्या भुएमऊ गेस्ट हाउसला पोहचल्या आहेत. त्यानंतर, पाचव्यांदा विजय मिळवलेल्या रायबरेली मतदार संघातील मतदार,कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्त्याचे सोनिया गांधी आभार व्यक्त करणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला असला तरीही नेहमीसारखी लीड यावेळी मिळाली नसल्याने, त्याची नेमकी कारणे काय आहेत. याबाबतची माहितीसुद्धा सोनिया गांधी ह्या पदाधिकारी यांच्याकडून घेण्याची शक्यता आहे.
रायबरेली लोकसभा मतदारसंघ हे कॉंग्रेसचे बालेकिल्ला समजला जातो. सोनिया गांधी ह्या २००४ नंतर सलग पाचव्यांदा खासदार म्हणून येथून निवडून आल्या आहेत. मात्र यावेळी विजयाचा अंतर कमी असल्याने सोनिया गांधी आपल्या रायबरेलीच्या दौऱ्यात याची कारणे शोधण्याचे प्रयत्न करतील.