लोकसभा निकालांपूर्वीच कर्नाटक काँग्रेसमध्ये 'कल्ला'; नेत्यांमध्ये जुंपली, आरोपांच्या फैरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 01:50 PM2019-05-21T13:50:23+5:302019-05-21T13:51:32+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे.
बंगळुरू - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते रोशन बेग यांनी पक्षातील सहकारी नेते सिद्धारामय्या, के. सी. वेणुगोपाल आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर गंभीर टीका केली आहे. कर्नाटकमध्ये भाजपाला 18 हून अधिक जागा मिळतील आणि याला सिद्धारामय्या कारणीभूत असतील, असा आरोप बेग यांनी केला आहे. तसेच पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची जोकर अशी संभावना त्यांनी केली आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन आघाडी सरकार स्थापन केले होते. मात्र स्थापनेपासूनच हे सरकार अस्थिर आहे. आता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये असंतोष आणि बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी आपल्या पक्षसहकाऱ्यांवर गंबीर आरोप केले आहे. '' कर्नाटकमध्ये भाजपाला 18 हून अधिक जागा मिळतील आणि याला सिद्धारामय्या कारणीभूत असतील, सिद्धारामय्या यांनी लिंगायत समाजाला पक्षापासून तोडले. आता आपले नाक कापून घेण्याशिवाय कुठलेही काम उरलेले नाही. सिद्धारामय्या यांनीच कर्नाटक सरकारला संकटात टाकले आहे. सरकार चालावे आणि कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदी राहावेत, अशी सिद्धारामय्या यांची इच्चा नाही,''असा आरोप रोशन बेग यांनी केला.
Roshan Baig, Congress when asked if Siddaramaiah is responsible for the collapse of the govt: KC Venugopal is a buffoon. I feel sorry for my leader Rahul Gandhi ji. Buffoons like Venugopal, the arrogant attitude of Siddaramaiah & the flop show of Gundu Rao...The result is this. https://t.co/WOxFkk9enD
— ANI (@ANI) May 21, 2019
कर्नाटकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपावरही रोशन बेग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जागावापात ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. तसेच मुस्लिम उमेदवाराला केवळ एकच जागा देण्यात आली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले,''असा आरोपही बेग यांनी केला.
Roshan Baig, Congress leader: No seats were given to Christians and only one seat was given to Muslims in Karnataka, they were ignored. I'm upset with this, we have been used. pic.twitter.com/RvJnia3gdV
— ANI (@ANI) May 21, 2019
दरम्यान, रोशन बेग यांनी केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे, पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी स्पष्ट केले आहे.
Karnataka Deputy Chief Minister G. Parameshwara on Congress leader Roshan Baig's reported comments "If Congress loses, Dinesh Gundu Rao & Siddaramaiah to blame": It is his personal opinion, it is not party's opinion or assessment. pic.twitter.com/PffV7QWMFv
— ANI (@ANI) May 21, 2019
तसेच कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेआहेत. रोशन बेग यांनी केलेले आरोप अयोग्य आणि राजकीय संधीसाधूपणाचे आहेत, असे म्हटले आहे.
Karnataka Pradesh Congress Committee chief Dinesh Gundu Rao on Roshan Baig: It's unbecoming of a politician of his stature to be speaking like this, it ranks of pure political opportunism. We will take required action when the time is right. pic.twitter.com/SnMjMOB9FD
— ANI (@ANI) May 21, 2019