नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. तर काही उमेदवारांना ती पास करण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. आयएएस अधिकारी नुपूर गोयल यांचीही अशीच कहाणी आहे. त्या देखील अनेक प्रयत्न करूनही मुलाखतीचे आव्हान पार करू शकल्या नव्हत्या. मात्र, त्यांचे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे त्यांना शेवटच्या प्रयत्नात 2019 मध्ये अखिल भारतीय रँक 11 मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत झाली.
दरम्यान, नुपूर गोयल या दिल्लीतील नरेला येथील रहिवासी आहेत. डीएव्ही कॉलेजमधून इंटरमिजिएट पूर्ण केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली. बीटेक केल्यानंतर त्यांनी इग्नूमधून लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली. खरं तर यावेळी त्याच्या काकांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांच्यापासून प्रेरित होऊन नुपूर यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरूवात केली.
पाचव्या प्रयत्नात बनल्या IAS 2014 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा पास केली, परंतु मुलाखत पास करण्यात त्यांना अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना प्राथमिक परीक्षाही पास करता आली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्या पुन्हा एकदा मुलाखतीला पोहोचल्या पण यश मिळू शकले नाही. लक्षणीय बाब म्हणजे चौथ्या प्रयत्नात देखील त्यांना अपयश आले. त्यानंतर त्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) नोकरीला लागल्या. इथेच त्यांनी शेवटच्या प्रयत्नाची तयारी केली आणि 2019 मध्ये AIR 11 मिळवून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
तरूणाईला दिला मोलाचा सल्लानागरी सेवा परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी शेवटच्या प्रयत्नापर्यंत हार मानू नये, असे नुपूर यांचे ठाम मत आहे. त्यांनी ध्येयाकडे वाटचाल करत राहावे. प्रिलिम्ससाठी मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या असतात, तर मुख्यसाठी उत्तर लिहिण्याचा सराव केला पाहिजे. उमेदवारांनी दररोज वर्तमानपत्र वाचावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"