हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारच्या काही आर्थिक धोरणांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केल्यामुळे भाजपामध्येच खळबळ उडाली आहे. सरकारने छोट्या, मध्यम व हस्तकला उद्योग, स्वयंरोजगार व्यवसाय, सहकार, कृषी, तसेच कृषी उद्योगांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे भागवत म्हणाले होते.केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी भागवत यांनी शेतकरी आणि शेतीशी संबंधित केलेल्या सूचनांनुसार पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. कृषी खात्यांतर्गत पशुधन विभागाला गायींची उत्पादकता कशी वाढेल व त्यांचे रक्षण करून अर्थव्यवस्था कशी फायदेशीर करता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. रसायने व खतेमंत्री अनंत कुमार यांनी सेंद्रीय खतांचा उपयोग कसा वाढविता येईल, हे बघण्यास सांगितले आहे.महसूल सचिव हसमुख अढिया यांना छोट्या आणि मध्यम उद्योगांना दिलासा द्या आणि जीएसटीतील जाचक बाबी दूर करण्यासाठी पावले टाका, असे सांगण्यात आले आहे. जीएसटीचीमध्ये अर्थमंत्रालय काही सवलती देईल, असे कळते. व्यापार व उद्योगांच्या अडचणी पाहून सहा महिन्यांत काही सवलती दिल्या जातील. भागवत यांच्या भाषणाचा मोठा भाग मोदी सरकारच्या ४० महिन्यांतील आर्थिक धोरणांवर होता. जन धन योजना, गॅस अनुदान, मुद्रा, कृषी विमा व अन्य धाडसी पावलांबद्दल भागवतांनी प्रशंसा केली, परंतु भागवत यांनी नोटाबंदीचा उल्लेख केला नाही. भागवत यांनी निति आयोग व राज्यांतील सल्लागार यांच्यावर केलेली टीका आश्चर्यकारक होती. धोरण आखणाºयांनी कोषातून बाहेर यावे, असेही ते म्हणाले. स्वदेशी मॉडेलचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. भाजपाच्या मुख्यालयात भागवतांच्या भाषणाची पुस्तिका उपलब्ध आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सर्व पदाधिकारी आणि प्रवक्ते यांनी ती वाचावी, अशा सूचना दिल्या आहेत.जागरण मंचाची कठोर टीकाभागवत यांनी अनेक आर्थिक आघाड्यांवर सरकारवर प्रत्यक्ष हल्ला चढवला होता. पक्षाने त्या टीकेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्वदेशी जागरण मंचने आर्थिक धोरणांवर जी भूमिका घेतली होती तिला भागवतांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.दुसºया दिवशी स्वदेशी जागरण मंचचे निमंत्रक एस. गुरूमूर्ती यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. स्वदेशी जागरण मंचने भारत हा ‘चीनची वसाहत’ होत असल्याची टीका करीत, त्या निषेधार्थ रामलीला मैदानावर मोठा मेळावा घेण्याचे ठरविले आहे. त्या तुलनेत भारतीय मजदूर संघ निष्क्रिय आहे.
आर्थिक धोरणांवरील भागवतांच्या नापसंतीनंतर सरकारमध्ये धावपळ, अनेक खाती लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 4:16 AM