ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - गेल्या पाच वर्षांपासून युट्युब या संकेतस्थळावर सर्वाधिक जास्त हिट मिळविणारे आणि नंबर एकला असणारे "गंगनम स्टाईल" गाणे मागे पडले आहे. "गंगनम स्टाईल" या गाण्याला "सी यू अगेन" या गाण्याने मागे टाकले आहे. आत्तापर्यंत युट्युबवर "सी यू अगेन" या गाण्याला तब्बल 2 अब्ज 90 कोटी लोकांनी पाहिले आहे.
गायक विज खलीफा आणि चार्ली पथ यांनी गायलेले "सी यू अगेन" हे गाणे "फास्ट ॲन्ड फ्यूरियस -7" या चित्रपटातील आहे. 2015 मध्ये रोजी प्रदर्शित झालेले हे गाणे हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरला समर्पित करण्यात आले होते. त्यावेळी या गाण्याला खूप प्रसिद्ध मिळाली होती.
"गंगनम स्टाइल" ...
दक्षिण कोरियाचा गायक साय याच्या "गंगनम स्टाइल" गाण्याने जगभरात धूम झाली होती. अनेक सिलिब्रिटींसह खेळाडू "गंगनम स्टाइल" या गाण्यावर थिरकले होते. या गाण्याने यूट्यूबचे सर्व रेकॉर्ड मोडत सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ अशी ओळख निर्माण केली होती. या गाण्याच्या व्हिडीओला इतके व्ह्यूज मिळाले होते की, युट्युबनेही काऊंट करणे विसरुन गेले होते. या गाण्याच्या हिट्स काऊंट करताना युट्यूबचे काऊंटर थकले आहे. खुद्द यू ट्यूबनेच याबाबतची घोषणा केली आहे.
"कोलावरी डी"...
तामिळ अभिनेता धनुष याच्या "कोलावरी डी" या गाण्याने सुद्धा अल्पावधीत चांगलीच लोकप्रियता मिळविली होती.या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की हे गाणे युट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या आत्तापर्यंत 125,078,346 इतकी आहे. 16 नोव्हेंबरला 2011 मध्ये हे गाणे प्रसिद्ध झाले होते. "कोलावरी डी" गाणे धनुषनेच लिहिले आणि गायले होते. संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनयाने हे गाणे संगीतबद्ध केले होते. धनुषच्या "3" या चित्रपटात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.
(व्हिडिओ साभार - युट्युब)