Gautam Gambhir Jayant Sinha Politics Retirement: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेराजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता भाजपचे आणखी एक खासदार जयंत सिन्हा यांनीही निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. हजारीबागचे भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी ट्विट करून पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली. त्यांनी थेट निवडणूक कर्तव्यापासून मुक्त करण्याची मागणी केली. भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत मदत करायची आहे. आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी लिहिले की, गेल्या दहा वर्षांपासून मला भारत आणि हजारीबागच्या लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. याशिवाय मला पंतप्रधानांनी अनेक संधी दिल्या आहेत. मी भाजप नेतृत्व आणि त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
PM मोदींच्या पहिल्या कार्यकाळात होते मंत्री
जयंत सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. 2014 मध्ये जयंत सिन्हा पहिल्यांदा लोकसभेतून खासदार झाले. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रीही करण्यात आले होते. जयंत सिन्हा हे 2016 ते 2019 या काळात हवाई वाहतूक राज्यमंत्री होते. याशिवाय ते 2014 ते 2016 दरम्यान अर्थराज्यमंत्रीही होते. जयंत सिन्हा यांनी 2019 मध्ये हजारीबाग मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले, परंतु पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना मंत्री करण्यात आले नाही.
गौतम गंभीरचीराजकारणातून निवृत्ती
आदल्या दिवशी भाजपचे पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनीही सांगितले होते की त्यांनी पक्षाला राजकीय कर्तव्यांपासून मुक्त करण्यास सांगितले आहे. जेणेकरून तो त्यांच्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकतील. भाजप अनेक नव्या नेत्यांना तिकीट देण्याचा विचार करत आहे. याचदरम्यान, गंभीरने हा निर्णय घेतला आहे.