अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडला आहे. प्रभू श्रीराम नव्या आणि भव्य-दिव्य मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर, अयोध्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण अयोध्या नगरी राममय झाली आहे. यातच आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मिनिटे पाच सेकंदाचा एका सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही 22 जानेवारीला अयोध्येत जे बघितले, ते आयुष्यभर स्मरणात राहील. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या 3.05 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अयोध्येतील सर्व स्मृती कैद आहेत. अगदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहोचण्यापासून, ते गर्भ गृहातील रामललांची पूजा, आरती आणि भाविकांचे भाव, इथपर्यंतचे सर्व सर्व क्षण या व्हिडिओमध्ये कैद आहेत.
या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान जेव्हा उपस्थितांना भेटण्यासाठी गेले तो क्षण आणि भक्तांवर फूलांचा वर्षावर करतानाचा क्षणही कैद आहे. अर्थात या छोट्याशा व्हिडिओ ते सर्व क्षण आहेत, जे तुम्हाला बघावेसे वाटतील. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा काही अंशदेखील देण्यात आला आहे. यात "शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले आहे." असे मोदी म्हणत आहेत.
या व्हडिओमध्ये हेलीकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलला यांच्या समोर जाईपर्यंत आणि गर्भगृहातून परत येईपर्यंतचे सर्व क्षण कैद आहेत. एवढेच नाही, तर रामलला यांची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर, भक्तांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू आले, तो क्षणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या व्हिडिओमध्ये आहे.