श्रीकृष्ण जन्मभूमी : काशीनंतर आता मथुरेतील शाही ईदगाहचं होणार सर्वेक्षण, उच्च न्यायालयानं दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:15 PM2023-12-14T16:15:08+5:302023-12-14T16:15:59+5:30

'भगवान श्री कृष्ण विराजमान' आणि 7 इतर लोकांनी ही याचिका दाखल केली होती. यात वकील हरी शंकर जैन, विष्णु शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या नावांचा समावेश आहे. याच याचिकांवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.

After Kashi krishna janmbhumi allahabad hc grants permission of mathura shahi eidgah survey | श्रीकृष्ण जन्मभूमी : काशीनंतर आता मथुरेतील शाही ईदगाहचं होणार सर्वेक्षण, उच्च न्यायालयानं दिली परवानगी

श्रीकृष्ण जन्मभूमी : काशीनंतर आता मथुरेतील शाही ईदगाहचं होणार सर्वेक्षण, उच्च न्यायालयानं दिली परवानगी

श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका स्वीकारत, शाही ईदगाह परिसरात कोर्ट कमिश्नर सर्व्हेसाठी मंजुरी दिली आहे. याच बरोबर, न्यायालयाने ईदगाह कमिटी आणि वक्फ बोर्डाचा युक्तिवाद फेटाळला आहे. आता सर्व्हे कमिश्नरची नियुक्ती केली जाईल.

शाही ईदगाहच्या सर्व्हेला मंजुरी - 
श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात अलाहाबाद उच्चन्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर, वकील विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, न्यायालयाने सर्व्हेला मंजुरी दिली आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी ही याचिका दाखल केली होती. 18 डिसेंबरला अॅडव्होकेट कमिशन निश्चित केला जाईल. अर्थात, सर्व्हेसाठी कोण कोण जाणार आणि सर्व्हेच्या टीममध्ये किती लोक असणार? हे 18 डिसेंबरलाच निश्चित होईल.

हिंदू पक्षाची याचीका स्वीकारली -
शाही ईदगाह परिसराचे सर्वेक्षण होणार, हे आज निश्चित झाले आहे. अलाहाबाद उच्चन्यायालयाने याला मंजुरी दिली आहे. शाही ईदगाह परिसराचे कोर्ट कमिशन नियुक्त करून सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी हिंदू पक्षाची मागणी उच्चन्यायालयाने मान्य केली आहे. गेल्या आठवड्यातच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली होती.

कुणी-कुणी दाखल केली होती याचिका? -
'भगवान श्री कृष्ण विराजमान' आणि 7 इतर लोकांनी ही याचिका दाखल केली होती. यात वकील हरी शंकर जैन, विष्णु शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या नावांचा समावेश आहे. याच याचिकांवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.

Web Title: After Kashi krishna janmbhumi allahabad hc grants permission of mathura shahi eidgah survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.