उज्जैन: भारतीय संघाचा खेळाडू उमेश यादव याने सोमवारी मध्य प्रदेशातीलउज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. तसेच जगात सुख आणि शांती नांदो यासाठी प्रार्थना केली असल्याचे यादवने सांगितले. यावेळी त्याने 'भस्म आरती'मध्येही सहभाग घेतला. भस्म आरती हा येथील एक प्रसिद्ध विधी असून ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 4 ते 5.30 दरम्यान ही आरती केली जाते.
दरम्यान, भस्म आरती झाल्यानंतर उमेश यादवने मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून जलाभिषेक केला. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना उमेश यादवने म्हटले, "आज मी बाबा महाकालची पूजा करण्यासाठी आलो आहे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी प्रार्थना केली आहे. तसेच जगात सुख-शांती नांदो यासाठी प्रार्थना केली आहे." खरं तर भारतीय संघातील काही खेळाडूंनी अलीकडेच महाकाल मंदिराला हजेरी लावली होती.
अलीकडेच म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वयाच्या 74 व्या उमेश यादवच्या वडिलांचे निधन झाले. वडील नावाचे छत्र हरपल्यानंतर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी उमेश यादवच्या घरी आली नन्ही परी आली. खरं तर उमेश यादव दुसऱ्यांदा झाला बाबा झाला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी 4 मार्च रोजी मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. त्यांनी 'भस्म आरती'मध्ये देखील सहभाग नोंदवला आणि मंदिराच्या गर्भगृहात जलाभिषेक केला. यापूर्वी अक्षर पटेल आणि त्यांच्या पत्नीने मागील महिन्यात मंदिरात जाऊन बाबा महाकालची पूजा केली होती. याशिवाय लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनीही बाबा महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट दिली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"