शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 17:03 IST

आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देभारताचे हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते.आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

 नवी दिल्ली : गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही आणि गलवानमध्ये आपल्या जवानांनी हे सिद्धही केले आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

विविध माध्यमांत छापून आलेल्या वृत्तांनुसार, गलवानमध्ये चीनने दिलेल्या धोक्यानंतर, भारतीय जवानांनी सावध नसतानाही चीनचे जवळपास 40 जवान मारले. आता भारताने पेंगाँग त्सो सरोवरापासून ते गलवान खोऱ्यापर्यंत आपले खास जवान चीनी सैनिकांना टक्कर देण्यासाठी तैनात केले आहेत. या जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताचे 'पहाडी योध्ये' -हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ट स्थरावरील अधिकृत सूत्रांनी सांगितले, की चीनी सैनिकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख उत्तर देण्याचे आदेश भारतीय जवानांना देण्यात आले आहेत. बोलले जाते, की या जवानांना गेल्या दशकांत उत्तरेकडील फ्रंटवर लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते. आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

'सर्वात खडतर लढाईसाठी दिले जाते प्रशिक्षण' -एका माजी लष्कर प्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे, पहाडांवरील लढाई सर्वात अवघड असते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्किममध्ये या जवानांपूढे कुणाचाही टिकाव लागू शकत नाही.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

पहाडांमध्ये भारताची आघाडी -चीन संबंधातील एका तज्ज्ञाने म्हटले आहे, चीनच्या ताब्यात असलेली तिबेटमधील पठारे सपाट आहेत. तर भारतातील पठारे उंच आहेत. पहाडी भागांवर कबजा करणे जेवढे अवघड तेवढेच तो टिकवणेही अवघड असते.

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

भारत-चीन हवाई ताकद -चीनकडे भारतात कोठेही डागले जाऊ शकतात, असे 104 न्युक्लिअर मिसाइल्स आहेत. मात्र, असे असले तरी आपल्याकडेही अग्नि 3 लॉन्चर सिस्टम आहे. जिच्या सहाय्याने भारतही संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यात हल्ला चढवू शकतो. एवढेच नाही, तर भारताकडे अन्विक क्षमता असलेली 51 विमानं आहेत. जे ग्रॅव्हिटी बॉम्बने सुसज्ज आहेत. या शिवायही भारताची  हवाई ताकद फार मोठी आहे. 

 

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक