नवी दिल्ली : शेतक-यांच्या मोर्चाने सोमवारी मुंबई दणाणून सोडल्यानंतर आता अन्य शेतक-यांचा मोर्चा दिल्लीत धडकला आहे. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी मंगळवारी संसद मार्गावर एकत्र आले. सरकार आश्वासने पाळत नसल्याचा आरोपही शेतकºयांनी यावेळी केला.उत्तर प्रदेशातील बलराम तिवारी म्हणाले की, बुंदेलखंडातील शेतकºयांकडून सामान्य दराच्या पाच पट दराने वीजबिल आकारले जात आहे. शेतकºयांच्या योजनांत भ्रष्टाचार होत आहे. भूमिहीन शेतकºयांना जमिनी दिल्या गेलेल्या नाहीत. शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.>समस्यांचा पाढाभारतीय किसान युनियनचेम्हणणे आहे की, शेतकरी सतत अडचणींचा सामना करीत आहेत. सरकार आश्वासने पूर्ण करत नाही. शेतकºयांच्या दुरवस्थेवर सरकार मौन बाळगून आहे.>मागण्या काय?स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्यावी. वीजबिल माफ करावे. राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आयोगाची स्थापना करावी. शेतकºयांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
मुंबईनंतर शेतकरी धडकले दिल्लीत, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:58 AM