शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

राजकीय नाट्यानंतर अहमद पटेल यांची सरशी, भाजपाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 1:54 AM

अहमदाबाद, दि. 9 - सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. पराभूत करण्यासाठी भाजपाने कसलेली कंबर, पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी रंगलेले राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. तर राज्यसभेच्या इतर ...

अहमदाबाद, दि. 9 - सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. पराभूत करण्यासाठी भाजपाने कसलेली कंबर, पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी रंगलेले राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपाच्या अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.

काल गुजरात राज्यसभेच्या दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री निवडणूक आयोगाने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या वाघेला गटातील दोन आमदारांचे मत रद्द करण्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या भोलाभाई आणि राघवजीभाई पटेल यांची मतं रद्दबातल ठरवली . त्यानंतर  मतमोजणीला सुरुवात झाली. दोन मते बाद झाल्याने एकूण 174 मतांची मोजणी झाली. त्यामुळे विजयासाठी 44 मतांची आवश्यकता होती. यात भाजपाच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. अमित शाह आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी 46 मते मिळाली, तर अहमद पटेल यांनी भाजपाच्या सर्व राजकीय रणनीतीला मात देत 44 मते मिळवून राज्यसभेसाठीचा रस्ता मोकळा केला.भोलाभाई आणि राघवजीभाई या दोघांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला दाखवल्याचे काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी सांगितल्यानंतर राजधानी दिल्लीत अनेक घडामोडींना वेग आला होता. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही दोन मते रद्द व्हावीत अशी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली होती . गुजरात राज्यसभेसाठी आज दिवसभरात 176 आमदारांनी मतदान केले होते. त्यानंतर आपला विजय निश्चित होईल असा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला होता. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झाली होती.अहमद पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश काँग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.