पाटोदा : गेल्या तीन चार आठवडयापासून हुलकावणी देणार्या पावसाने आज येवला तालुक्यातील पश्चिम उत्तर भागातील कातरणी विखरणी साताळी,जळगाव नेऊर,जऊळके,शेवगे,सातारे,नेवूरगाव,मुखेडफाटा परिसरात जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असुन त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तिवला होता त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीपूर्व मशागती पूर्ण करून तयारी करून ठेवली होती.मात्र हवामान खात्याचा पूर्ण अंदाज चुकीचा निघाला असुन पावसाने गेल्या चार आठवडयापासून हुलकावणी दिली होती.त्यामुळे शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागून होते .आज दुपारी वातावरणात अचानक बदल होवून पावसाचे वातावरण तयार झाले आज झालेल्या या जोरदार पावसाने दिलासा मिळाला सर्वत्र पाणीच पाणी केले शेतात सर्वत्र पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते.गेल्या चार वर्षापासून सततचा दुष्काळ आणि गतवर्षी खरीपपाठोपाठ रब्बीचा हंगाम शेतकर्यांच्या हातून गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता.वरु ण राजाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा काही अंशी सुखावला आहे. या पावसाने उद्यापासून शेतीकामांना वेग येणार आहे.पाऊस पडतो की नाही यामुळे काही शेतकर्यांनी शेती कामांकडे दुर्लक्ष केले होते.परंतु आजच्या पावसामुळे शेतीकामांना वेग येणार आहे. (वार्ताहर)
पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला
By admin | Published: June 22, 2016 10:04 PM