हैदराबाद: देशातील कोरोनाची लाट हळुहळू ओसरताना दिसत आहे. पण, आताही अनेक ठिकाणी गंभीर लक्षणांसह विविध आजार होत असलेल्या रुग्णांची माहिती मिळत आहे. असेच एक प्रकरण हैदराबादमधून समोर आले आहे. येथील एका रुग्णामध्ये कोरोनातून ठीक झाल्यानंतर मेंदूत दुर्मिळ व्हाइट फंगसचा फोड म्हणजेच एस्परगिलस(Aspergillus) आढळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाला मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. आजारपणात असतानाही त्या रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये गंभीर संक्रमण झालं होतं. या संक्रमणामुळे त्याला बोलण्यातही अडचणी येत होत्या. पण, अखेर त्या रुग्णानं कोरोनावर मात केली. पण, नंतर एका स्कॅनमधून त्या रुग्णाच्या मेंदूत एक गाठ आढळून आली. बरेच दिवस उपचार करुनही ती गाठ ठीक होत नव्हती. अखेर सर्जरी केल्यानंतर ती गाठ नसून, व्हाइट फंगसचा फोड असल्याचं समोर आलं.
डायबेटीक रुग्णामध्ये ब्लॅक फंगस आढळतोहैदराबादमधील सनशाइन हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. पी. रंगनाथम सांगतात की, मेंदुमध्ये फोड होणे अतिशय दुर्मिळ आहे. भारतात अशा रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. आपण इतक्या दिवसांपासून पाहत आलोय की, फंगस इंफेक्शन डायबेटीज असलेल्या रुग्णाला लवकर संक्रमित करतं. पण, या रुग्णाला डायबेटीजचा त्रास नव्हात. त्यामुळे हे याला अतिशय दुर्मिळ प्रकरण म्हणता येईल.
दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढलेभारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले. विशेषत: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अशा रुग्णांची संख्या जास्त आहे. या काळात फंगसचेही अनेक प्रकार समोर आले. आता हैदराबादमधील रुग्णाला फंगसचा फोड अल्यामुळे डॉक्टरांसमोर अजून एक आव्हान तयार होण्याची शक्यता आहे.