सुटकेनंतर गुलाबराव पाटील पाळधीकडे रवाना दुपारी १.१५ वाजता मिळाले सुटकेचे आदेश : जिल्हा कारागृहात शिवसैनिक व समर्थकांची मोठी गर्दी
By admin | Published: June 19, 2016 12:17 AM
जळगाव : जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाकडून आमदार गुलाबराव पाटील यांच्या सुटकेचे आदेश कारागृह प्रशासनाला शनिवारी दुपारी १.१५ वाजता प्राप्त झाले. न्याय विभागाकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर ते दुपारी १.२० वाजता शिवसैनिक व समर्थकांसह आईच्या अंत्ययात्रेसाठी कारने पाळधीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही.
जळगाव : जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाकडून आमदार गुलाबराव पाटील यांच्या सुटकेचे आदेश कारागृह प्रशासनाला शनिवारी दुपारी १.१५ वाजता प्राप्त झाले. न्याय विभागाकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर ते दुपारी १.२० वाजता शिवसैनिक व समर्थकांसह आईच्या अंत्ययात्रेसाठी कारने पाळधीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही.शिवसैनिक व समर्थक सकाळीच न्यायालयात दाखलआमदार गुलाबराव पाटील यांच्या जामीन अर्जावर शनिवारी निकाल होणार असल्याने सकाळपासूनच जिल्हाभरातून आलेले शिवसैनिक व समर्थक मंडळी जिल्हा न्यायालयात दाखल झाली होती. सकाळी १०.४५ वाजता निकालाच्या कामकाजाला सुरुवात झाली. निकाल काय लागतो? याविषयी प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती. न्यायाधीश एस.बी. देवरे यांच्या न्यायालयातून बाहेर पडणार्या प्रत्येक वकिलाला बाहेरील मंडळी काय झाले? असे प्रश्न करीत होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास न्यायालयाने जामीन मंजूर झाल्याने आदेश पारीत केले. त्यानंतर शिवसैनिक व समर्थकांच्या चेहर्यावर एक प्रकारचे समाधान होते. जामीन मंजूर झाल्याचा निकाल ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयात झालेली गर्दी एकदम ओसरली. शिवसैनिक व समर्थकांनी त्यानंतर आपला मोर्चा जिल्हा कारागृहाकडे वळवला.जिल्हा कारागृहाच्या आवारात प्रचंड गर्दीजिल्हा कारागृहाच्या आवारातही शिवसैनिक व समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. न्यायालयात कामकाज सुरू असतानाही काही जण याठिकाणी ठाण मांडून बसले होते. भ्रमणध्वनीवरून ते न्यायालयातील स्थितीचा आढावा घेत होते. दुपारी १२ वाजेनंतर न्यायालयातील गर्दीही इकडे दाखल झाली होती. आमदार किशोर पाटील यांनी सकाळच्या सुमारास कारागृहात जाऊन आमदार पाटील यांची भेट घेतली होती. न्यायालयातून जामिनाचा निर्णय ऐकून घेतल्यानंतर दुपारीदेखील त्यांनी पुन्हा आमदार पाटील यांची भेट घेतली. भेट घेऊन दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कारागृहातून बाहेर आले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, उप जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी जि.प. सदस्य विश्वनाथ पाटील, राजेंद्र चव्हाण, गणेश सोनवणे, मंगला बारी, शोभा चौधरी यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दुपारी १.२० वाजता सुटकान्यायालयातून सुटकेचे आदेश आल्यानंतर दुपारी १.२० वाजता आमदार गुलाबराव पाटील यांची सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना भेेटण्यासाठी शिवसैनिक व समर्थकांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकच गर्दी केली. मात्र, ते कारने लागलीच पाळधीकडे रवाना झाले. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला नाही.