श्रीनगर - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले असून, यामध्ये 1 पोलीस जखमी झाला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून काही राजकीय नेत्यांसह 100 जणांना अटक करण्यात आली आहे.काश्मीरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. श्रीनगरमध्ये काही दुकाने उघडलेली नजरेस पडत आहेत. तसेच बंदी असतानाही रस्त्यांवर किरकोळ वर्दळ दिसून येत आहे. तणाव असला तरी काश्मीरमधील एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दहफेकीचे काही किरकोळ प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले.
कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक, 1 पोलीस जखमी, 100 अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 7:22 PM