गादग - 'काँग्रेस पक्षाने राज्याला लुटण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही. कर्नाटक निवडणूक निकालानंतर काँग्रेस पक्ष पीपीपी काँग्रेस बनेल. म्हणजेच पंजाब, पुद्दूचेरी आणि परीवार काँग्रेस असा बनेल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोर धरू लागला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकात गदगमध्ये सभेला संबोधीत केलं, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक हारण्याची काँग्रेसला भीती आहे. यामागेही कारण आहे. काँग्रेसच्या नेते व मंत्र्यांकडे मोठा टँक आहे. त्या टँकमध्ये पैसे भरलेले असून त्याची पाईपलाईन थेट दिल्लीमध्ये जोडली आहे. कर्नाटका हातातून गेलं तर नेत्यांचं दिल्लीमध्ये काय होईल? अशी खोचक टीका मोदींनी केली आहे.
कर्नाटकामध्ये नैसर्गिक संसाधन विकसित करण्याचा काँग्रेसचा काही उद्देश नाही. त्यांच्या नेत्यांचे खिशे जोपर्यंत भरले आहेत, तो पर्यंत ते खुश राहणार असं मोदींनी म्हटलं. कर्नाटकाच्या जंगलांमध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या संधी दिसत आहेत. भ्रष्टाचार हेच त्या पक्षाचं मूळ आहे, अशी बोचरी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.