पाकिस्तानसोबतभारताचे संबंध चांगले नसले तरी, गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांतील लोक एकमेकांसोबत लग्न करताना दिसत आहेत आणि त्यांची चर्चाही होत आहे. आधी सीमा, यानंतर अंजू आणि आता जोधपूरच्या वकिलाने कराचीतील एका महिलेसोबत ऑनलाइन निकाह केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात भारतातील अरबाज आणि पाकिस्तानातील अमिना यांनी ऑनलाइन पद्धतीने निकाह केला. कुठल्याही प्रकारच्या गाजावाजा न करता काझीने या दोघांचा निकाह करून दिला. जोधपुर आणि कराची येथे मोठ-मोठे एलईडी स्क्रीन लावून हा निकाह दाखवण्यात आला.
अमिनाला मिळाला नाही व्हिसा - गेल्या आठवड्यांत 2 ऑगस्ट रोजी झालेल्या या निकाहाबद्दल नवरदेवाचे वडील मोहम्मद अफजल म्हणाले, “आम्ही आमच्या पाकिस्तानातील नातलगांसोबत आधीच रोका केला होता आणि अमिनाला व्हिसा मिळण्याची वाट पाहत होतो. मात्र व्हिसाच्या प्रक्रियेत उशीर झाल्याने आम्ही या दोघांचा ऑनलाईन पद्धतीने निकाह करण्याचे ठरवले.”
सातत्याने होतायत सीमापार विवाह -अफजल यांचे म्हणणे आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण संबंध असले तरी, याचा सीमापार होणाऱ्या विवाह संबंधांवर फारसा परिणाम झालेला नाही. कारण दोन्ही देशांमध्ये एकमेकांचे नातलग आहेत. आता आम्ही अमिनाला व्हिसा मिळण्याची वाट पाहू.”