लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं महागात पडलं; तरुणीचा मृत्यू झाला, भोपाळमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 16:06 IST2021-09-19T15:49:42+5:302021-09-19T16:06:57+5:30
मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं महागात पडलं; तरुणीचा मृत्यू झाला, भोपाळमधील घटना
मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं तरुण अन् तरुणीला महागात पडलं आहे. दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याने तरूणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे तिला स्वतःचा जीवही गमवावा लागला आहे.
संबंधित तरुणी आणि तरुण मुलाचा साखरपुडा झाला होता. लवकरच दोघांचं लग्न होणार होतं. यापूर्वीच तरुणाने हॉटेलमध्ये एक खोली बुक करून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तरूणीला अधिक प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. त्रास होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण; आरोपीसह १९ वर्षीय मुलीनेही तिच्यासोबत नको तो प्रकार केला! https://t.co/Pp7qVV3NcR
— Lokmat (@MiLOKMAT) September 19, 2021
डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नानंतरही तरूणीचा रक्तस्त्राव थांबला नाही. या कारणामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आला. भोपाळचे एएसपी अंकित जयस्वाल म्हणाले की, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. मृत्यूपूर्वी मुलीने त्या तरुणाच्या त्याच्याविरुद्ध कोणतंही वक्तव्य केलं नाही. दोघेही बालिग आहेत. तरीही पोलीस या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर तपास करत आहेत.
हातोडा दाखवून तिच्या मित्रांना पळवलं; शिर्डीहून आलेल्या मुलीसोबत वेगळच घडलं, ठाणे हादरलं! https://t.co/7CIAgGXiyO
— Lokmat (@MiLOKMAT) September 12, 2021