नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे. दिल्लीतील शाहीन बागसारख्या ठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी होत असलेल्या मंडळींकडून करण्यात येत असलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे वादास तोंड फुटत आहे. एकीकडे शरजील इमामने आसामसह पूर्वोत्तर भारत देशाच्या मुख्य भागापासून वेगळे करण्याचा मनसुबा व्यक्त करणाऱ्या केलेल्या विधानावरून वाद झाला असतानाच आता शाहीन बाग येथील आंदोलनातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कुख्यात दहशतवादी अफझल गुरू हा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळाहिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहनभाजपा नेते संबित पात्रा यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ''आता त्या नापाक शरजील इमामनंतर या बाई काय म्हणताहेत तेही ऐका. आमचा कुणावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयावरसुद्धा विश्वास नाही. अफझल गुरू निर्दोष होता. रामजन्मभूमीवर मशीद बांधायची होती. मित्रानो एवढी विषाची शेती या काही दिवसांत तर झालेली नाही?'' असा सवाल संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.