शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या मार्गावर? ममता बॅनर्जी अन् पुतण्यात कोल्ड वॉर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:29 IST

अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होणार की काय, अशी शंका उपस्थित करणारी राजकीय घडामोड घडू लागली आहे. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात शीत युद्ध सुरु झाले असून पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त आहे. 

अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

ममता यांच्यानंतर पक्षात अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. कलाकारांवर टाकलेल्या बहिष्कारावर ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाताच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या कलाकारांनी ममता सरकारविरोधात टीका केली त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमुलने घेतला आहे. यास अभिषेक यांचा विरोध आहे. नववर्षाच्या स्वागताला गायिका  लग्नजीता चक्रवर्ती हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतू, कोलकाताच्या स्थानिक नगरसेवकाने हा कार्यक्रम रद्द करत सरकारविरोधात बोललेल्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावरून हा वाद सुरु झाला आहे. 

गायिकेचा कार्यक्रम रद्द केल्यानंतर टीएमसीचे वरिष्ठ प्रवक्ते कुणाल घोष यांनी ३१ डिसेंबरला एक्सवर पोस्ट टाकली होती. त्यात ज्या कलाकारांनी जाणूनबुजून बदनामी केली, मुख्यमंत्री, सरकार आणि पक्षावर टीका केली, अपमान करून चुकीची माहिती पसरविली त्यांना टीएमसी नेत्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही मंचावर घेऊ नये असे म्हटले होते. त्यांचा बहिष्कार केला जावा, असे त्यांनी आवाहन टीएमसी नेत्यांना केले होते. 

त्यापुढे जात जर कोणी नेता याच्याशी सहमत नसेल तर त्याने वरिष्ठ नेतृत्वाचा सल्ला घ्यावा, असेही म्हटले होते. अर्थात हे वक्तव्य वरिष्ठांच्या म्हणजेच ममता बॅनर्जींच्या सहमतीनेच केले गेले होते. यावर अभिषेक बॅनर्जी यांनी कोणी पक्षातर्फे असे म्हटले आहे का, ममता बॅनर्जींनी किंवा मी असे म्हटलेय का असा सवाल केला होता. सर्वांना स्वातंत्र्य आहे. मी कोणाला कोणासोबत, कुठे गावे यासाठी बळजबरी करू इच्छित नाही, असे म्हटले होते. अभिषेक यांच्या या भूमिकेलाही अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. यामुळे आता ममता आणि पुतण्यात पक्षातील वर्चस्वावरून कोल्ड वॉर सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस