देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उपासमारीमुळे कर्मभूमीत मरण्यापेक्षा अनेक मजूरांनी जन्मभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जथ्येच्या जथ्ये गावी परतताना दिसत होते. अनेकांनी मिळेत त्या वाहनानं किंवा पायी जाण्याचा निर्णय घेतला. पण, कोईम्बतूर येथील एका मजूरानं घरी जाण्यासाठी चक्क बाईकची चोरी केली. घरी पोहोचल्यानंतर त्यानं जे केलं, ते जाणून सर्वांनाच आश्चर्यच बसेल...
माहितीनुसार 30 वर्षीय प्रशांत यानं ती बाईक चोरली होती. मन्नार्गुडी येथे तो राहतो आणि कोईम्बतूर येथील एका बेकरीत तो कामाला होता. 18 मे रोजी त्यानं घरी जाण्यासाठी 34 वर्षीय सुरेश कुमारची बाईक सुलूर, कोईम्बतूर येथून चोरली. त्यानं तो तामिळनाडू जिल्ह्यातील तिरुवरूर जिल्ह्यातील मन्नर्गुडी या गावी गेला. कन्नमपलायम पिरीवू येथील ऑफिसजवळ सुरेशनं त्याची बाईक पार्क केली होती. 18 मे रोजी दुपारी 1 वाजता बाईक चोरीला गेल्याचे सुरेशला लक्षात आले. त्यानं सुलूर पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. लॉकडाऊनच्या कामात व्यग्र असल्यामुळे लॉकडाऊननंतर तपास सुरू करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
त्यानंतर सुरेशनं CCTV फुटेज पाहून स्वतः तपास सुरू केला. त्यात एक व्यक्ती बाईक चोरताना त्याला दिसली आणि त्यानं त्याचा फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून प्रशांतची माहिती मिळवली. कोईम्बतूर येथील प्रशांतच्या घरापर्यंतची सुरेश गेला. तेव्हा प्रशांत गावी गेल्याचे त्याला समजले. आपली चौकशी सुरू असल्याचे प्रशांतला कळाले आणि बाईक कुरीअर केली. कोईम्बतूर येथील सुरेश कुमार याला रविवारी कुरिअर ऑफिसमधून फोन आला. त्यांनी सांगितले की, तुमची बाईक पोहोचवायची आहे. दोन आठवड्यांपूर्वी चोरीला गेलेली ही तिच बाईक होती. ज्या व्यक्तीनं ती चोरली त्यानं रजिस्टर सर्टिफिकेटवरून मालकाचा पत्ता काढला आणि ती बाईक कुरीअर केली. पण, सुरेशला त्यासाठी 1400 रुपये मोजावे लागले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन
नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल
हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!
विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज
Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर