कोची : केरळमध्ये सूर्यास्तानंतर पूजास्थळी प्रचंड आवाज करणारे फटाके फोडण्यासह आतषबाजीवर बंदी आणण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. कोल्लमच्या मंदिरातील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११० झाली असताना अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी म्हणून न्यायालयाने हा आदेश दिला.मंदिरातील अग्निकांडाचा सीबीआयकडून तपास करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, याचा अभ्यास केला जावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधीशांनी मंदिरातील आतषबाजीवर बंदी आणण्याची मागणी करणारे पाठविलेले पत्रच जनहित याचिका मानत न्या. थोट्टाथील बी. राधाकृष्णन आणि न्या. अनूू शिवरामन यांच्या खंडपीठाने सूर्यास्तानंतर मोठा आवाजासह केल्या जाणाऱ्या आतषबाजीला मुभा दिली जाणार नाही. दिवसाच्यावेळीही फटाक्यांचा आवाज निर्धारित मर्यादेपलीकडे नसावा, असे आदेशात म्हटले आहे.
सूर्यास्तानंतर पूजास्थळी आतषबाजीवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2016 2:36 AM