'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:47 PM2024-02-01T23:47:46+5:302024-02-01T23:49:50+5:30

काल आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली.

After the action on Paytm, Congress leader Rahul Gandhi criticized the central government | 'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पेटीएमवर कारवाई केली. २९ फेब्रुवारीपासून पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. जनतेच्या कष्टाच्या पैशाची लूट करून उभारलेल्या कंपन्यांना राजकीय आश्रयदाते वाचवत आहे.

राहुल गांधी म्हणाले, "संस्थांचे स्वातंत्र संपवून सरकार देशाला बर्बाद करत आहे. पेटीएम फ्रॉड याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह वृत्तपत्रात पूर्ण पान माहिती देणारी पेटीएम फ्रॉडवर सेबी आणि आरबीआय सारख्या नियामक संस्था मूक प्रेक्षक राहिले आहेत." अशा राजकीय आश्रयाने जनतेच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची लूट करून मोठ्या बनलेल्या अनेक कंपन्यांना वाचवले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

Paytm'च्या सीईओंनी RBI ची बंदी झुगारली, आता 'हे' काम करणार

याआधी गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले होते. बँकेचे ऑडिट झाल्यानंतर सेंट्रल बँकेने पेमेंट बँकेकडे नवीन ग्राहक येणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ पासून ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणि वॉलेट FASTag मध्ये ठेवी/टॉप-अप स्वीकारू शकणार नाही.

सेंट्रल बँकेच्या या आदेशानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारीपासून नवीन ग्राहक जोडू शकणार नाही, पण विद्यमान ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. यासोबतच ग्राहक बचत, करंट, प्रीपेड, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतात.

Web Title: After the action on Paytm, Congress leader Rahul Gandhi criticized the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.