शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

देणगी दिल्यानंतर ‘मेघा’वर झाली कंत्राटांची बरसात; सर्वात लांब बोगद्याचे कामही कंपनीलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 6:39 AM

चौकशी सुरू असलेल्या ४१ कंपन्यांची सत्ताधाऱ्यांना २,७४१ कोटींची देणगी?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निवडणूक राेखे खरेदी करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या मेघा इंजिनीअरिंगवर रोखे खरेदीच्या तारखांच्या आसपास कोट्यवधींच्या कंत्राटांची बरसात झाल्याचे आढळले आहे. कंपनीला उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये अनेक कंत्राटे मिळाली. कंपनीने बीआरएसला १९५ काेटी, डीएमकेला ८५ काेटी, वायएसआर काँग्रेसला  ३७ काेटी, टीडीपीला २५ काेटी, काॅंग्रेसला १७ काेटींची देणगी कंपनीने दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयू पक्षाला मेघा इंजिनीअरिंगने ७ जानेवारी २०२२ राेजी १० कोटींची देणगी दिली. त्यानंतर मार्च २०२२मध्ये कंपनीला २३० किलोमीटर लांबीचा दरभंगा एक्स्प्रेस-वे बांधण्याचे कंत्राट मिळाले. या कंपनीने सर्वात कमी रकमेची बाेली लावली हाेती.

  • जदयूला मिळालेली देणगी

- मेघा इंजि. - १० काेटी- श्री सिमेंट - २ काेटी- भारती इन्फ्राटेल - १ काेटी

राेखे खरेदी, कंत्राट मिळाल्याचा काळ

# ऑक्टाेबर २०२० : २० काेटी - जम्मू-काश्मीरमध्ये आशियातील सर्वाधिक लांबीच्या बाेगद्याचे काम त्याच वर्षी ऑक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये मिळाले.# एप्रिल २०२३ : १४० काेटी- कंपनीला मुंबई बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनचे स्थानक उभारण्याचे ३,६८१ काेटी रुपयांचे कंत्राट मार्च २०२३मध्ये मिळाले.# ऑक्टाेबर २०१९ : ५ काेटी- आंध्र प्रदेशमध्ये पाेलावरम प्रकल्पाचे ४,३५८ काेटी रुपयांचे कंत्राट नाेव्हेंबर २०१९मध्ये मिळाले हाेते.

चौकशी सुरू असलेल्या ४१ कंपन्यांची सत्ताधाऱ्यांना २,७४१ कोटींची देणगी?

सीबीआय, ईडी, आयकर खात्याकडून चौकशी सुरू असलेल्या ४१ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला २७४१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या कंपन्यांवर विविध तपास यंत्रणा व केंद्रीय खात्यांकडून धाडी घातल्या होत्या. त्यानंतर या कंपन्यांनी भाजपला १६९८ कोटी रुपयांचा निधी दिला, असे निवडणूक रोखे योजनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. 

त्यांचे वकील ॲड. प्रशांत भूषण यांनी सांगितले की, ३० बनावट कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. विविध कामांची १७२ कंत्राटे सरकारकडून मिळालेल्या ३३ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे पक्षांना निधी दिला आहे. या कंत्राटांच्या कामांच्या खर्चाची एकूण रक्कम ३.७ लाख कोटी रुपये आहे. त्याबदल्यात भाजपला १७५१ कोटी रुपयांची देणगी देण्यात आल्याचा दावाही ॲड. प्रशांत भूषण यांनी केला.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSBIएसबीआयJanta Dal Unitedजनता दल युनायटेडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय