शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

राम मंदिर उद्घाटनानंतर भाजपची मोठी तयारी! पीएम मोदींच्या नेतृत्वात देशात १४० रॅली, ५१ टक्क्यांचं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:08 AM

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

PM Narendra Modi ( Marathi News ) : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यानंतर लगेचच भाजप लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. सुरुवातीला भाजप 'गांव चलो अभियान' लाँच करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून भाजपचे नेते ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गावा गावात पोहोचणार आहेत, या निवडणुकीत भाजपने गावागावांना फोकस केले आहे. या कॅम्पेनमध्ये भाजपचे नेते गावागावत मोदी सरकाच्या कामाची माहिती देणार असल्याचे बोलले जात आहे. 

‘डोनेट फॉर देश’ मोहिमेतून पक्षाला किती देणगी मिळाली? काँग्रेस नेत्याने आकडाच सांगितला

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे हे सर्वात मोठे अभियान आहे. या काळात पीएम नरेंद्र मोदी देशभरात १४० सभा घेणार आहेत. 'गाव चलो अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर पक्षाला ५१ टक्के मते मिळावीत, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने असा प्रचार केला होता, अशी माहिती आहे. याचा फायदाही मतदारांशी जोडण्यात पक्षाला झाल्याचे बोलले जात आहे.

या कॅम्पेनसाठी भाजपने जोरदार तयारी केली

या कॅम्पेनसाठी भाजपने टीम तयार केल्या आहेत. याअंतर्गत राज्यस्तरीय टीम तयार करण्यात येणार असून त्यात एक निमंत्रक आणि चार सहसंयोजक असतील. जिल्हास्तरीय टीममध्ये एक संयोजक आणि दोन सहसंयोजक असतील. विभागीय टीममध्ये एक समन्वयक असेल. गाव आणि शहरी संघांचे समन्वयक असतील. ही मोहीम ११ फेब्रुवारीला संपली तरी कामगारांच्या जबाबदाऱ्या संपणार नाहीत. लोकसभा निवडणूक संपेपर्यंत गावात किंवा शहरी बूथला भेट देणाऱ्या कार्यकर्त्याला १५ दिवसांतून एकदा भेट द्यावी लागेल.

तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: रोड शो मध्ये सहभाग घेणार आहेत. यादरम्यान ते १४० हून अधिक लोकसभा मतदारसंघातील प्रभारींकडून पक्षाच्या उमेदवारांची माहिती घेणार आहेत. हे सर्व राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर होणार असल्याचे पक्षाशी संबंधित लोकांनी सांगितले. क्लस्टरमध्ये लोकसभेच्या ७-८ जागा आहेत. याचे नेतृत्व स्थानिक भाजप नेत्याकडे आहे, पण तो निवडणूक लढवत नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक क्लस्टरमधून किमान एका मतदारसंघाला भेट देणार आहेत, तिथे ते मोठी रॅली किंवा रोड शो करताना दिसतील. पीएम मोदी क्लस्टर प्रभारी तसेच मतदारसंघातील स्थानिक नेत्यांशीही संवाद साधणार आहेत. बाजप विरोधी पक्षांनीही लोकसभेची जोरदार तयारी केली असून इंडिया आघाडीची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी