शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

निकालानंतर भ्रष्टांचा मुक्काम असेल तुरुंगात, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 1:20 PM

पुरुलिया, बिष्णुपूर येथे मोदींच्या रविवारी प्रचारसभा झाल्या. दोन्ही ठिकाणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.  

पुरुलिया/बिष्णुपूर (पश्चिम बंगाल) : कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला सोडले जाणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे. ४ जूनला नवे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा मुक्काम तुरुंगात असेल आणि उर्वरित आयुष्य ते तेथेच व्यतित करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. पुरुलिया, बिष्णुपूर येथे मोदींच्या रविवारी प्रचारसभा झाल्या. दोन्ही ठिकाणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.  

पुरुलिया येथे बोलताना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाविरोधात केलेल्या टिप्पण्यांचा निषेध केला. तृणमूल काँग्रेसने शालीनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ते इस्कॉन, रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाविरुद्ध अफवा पसरवत आहेत. भ्रष्टाचाराबाबत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस नेत्यांच्या घरी घबाड सापडले तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्याकडेही रोख रक्कम सापडली आहे़त. कोणत्याही भ्रष्टाला सोडले जाणार नाह. तर, काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत असल्याने कोणताही उद्योगपती काँग्रेसशासित राज्यांत गुंतवणूक करण्यापूर्वी पन्नास वेळा विचार करील, अशी टीका माेदींनी जमशेदपूर येथील सभेत केली. 

‘इंडी’ आघाडी फक्त आपल्या कुटुंबासाठी राजकारण करते : अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितले की, विरोधकांची संपूर्ण ‘इंडी’ आघाडी आपल्या मुला-मुलींसाठी राजकारण करते. लालू यादव, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचे आहे.

अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नीरज त्रिपाठी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले, ‘जे आपल्या मुला-मुलींसाठी राजकारण करतात, ते तुमचे भले करतात का? ‘इंडी’ (इंडिया) आघाडी म्हणते की, त्यांचे सरकार आल्यास ते कलम ३७० पुन्हा लागू करतील, तिहेरी तलाक परत आणतील, सीएए काढून टाकतील. ही घराणेशाहीची समर्थक ‘इंडी’ आघाडी देशाला पुढे नेऊ शकत नाही.’ 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल