शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

न्यायालयाच्या पाय-या चढल्यानंतर सिंघानिया पिता-पुत्र चार भिंतींच्या आत वाद सोडवण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 11:18 AM

उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी एकत्र येऊन संपत्तीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करु अशी माहिती उच्च न्यायालयात दिली आहे

मुंबई, दि. 5 - उद्योगपती विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी एकत्र येऊन संपत्तीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करु अशी माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. दोघांच्याही वकिलांनी न्यायालयात ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे न्यायालयानेच दोघांना चर्चा करुन मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोघांनाही एकत्र येऊन वादावर तोडगा काढण्यास सांगितलं होतं. हे खासगी प्रकरण असल्याने, त्याप्रमाणेच सोडवलं गेलं पाहिजे असं न्यायालयाने सांगितलं होतं. 

विजयपत सिंघानिया यांनी आपला मुलगा आणि ‘रेमंड लिमिटेड’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये मुंबईतील मलबार हिलमधील जे के हाऊस या 36 मजली इमारतीतील ड्युप्लेक्स फ्लॅटचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधी वारंवार गौतम सिंघानिया यांना आठवण करुन देण्यात आलं, मात्र त्याचा फायदा झाला नाही असंही याचिकेत म्हटलं होतं. 

दोन्ही पक्षाच्या वकिलांनी पुढील आठवड्यात मीटिंग होणार असल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 11 सप्टेंबर तारीख दिली आहे. दरम्यान न्यायालयाने, रेमंडला जे के हाऊसमधील संपत्तीची विक्री न करण्याचा तसंच तिस-या पक्षाला मधे न आणण्याचा आदेश दिला आहे. 

हा पूर्ण वाद जेके हाऊसबाबत आहे. ही बिल्डिंग १९६० मध्ये बांधली गेली. तेव्हा ती १४ माळ्यांची होती. नंतर या बिल्डिंगचे चार ड्युप्लेक्स रेमंडची शाखा असलेल्या पश्मिना होल्डिंग्सला दिले गेले. त्यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, सिंघानिया यांनी कंपनीतील आपले शेअर मुलाला दिले होते. मीडियात येणाºया बातम्यांनुसार, या शेअर्सची किंमत सुमारे १००० कोटी रुपये इतकी होती. परंतु आता गौतम यांनी त्यांना निराधार सोडले असून त्यांच्याकडून गाडी व चालकही परत घेतले आहेत. मलबार हिल येथे त्यांचा स्वत:चा ३६ माळ्यांचा ड्युप्लेक्स जेके हाऊस आहे. परंतु येथे राहण्यासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागत आहे.

२०००मध्ये मुलाकडे सोपवली रेमंडची सूत्रेविजयपत यांचा मुलगा गौतम सिंघानिया याने सन २००० मध्ये रेमंडची सूत्रे हातात घेतली. विजयपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये रेमंडमधील आपले १ हजार ४१ कोटीचे ३७.१७ टक्के शेअर्स गौतम सिंघानियाच्या नावे केले. जगभरात प्रसिद्ध असलेल्या रेमंड या वस्त्रोद्योगाचा पाया १९२५ मध्ये रचला गेला. या कंपनीची पहिली रिटेल शोरूम १९५८ मध्ये मुंबईत उघडली गेली. १९८० मध्ये विजयपत यांनी कंपनीची सूत्रे सांभाळली.

टॅग्स :Courtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट