ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - देशातील धर्मांधता आणि वाढत्या असहिष्णूतेविरोधात साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार करण्याचा सपाटा लावला असतानाच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी साहित्यिकांनी लिखाण थांबवल्यावर बघू अशी प्रतिक्रिया दिल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
दादरीतील घटनेनंतर देशभरातील सुमारे २२ साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार करत निषेध दर्शवला आहे. यासंदर्भात महेशर शर्मा म्हणाले, साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यिकांनी साहित्यिकांना दिलेला पुरस्कार आहे, यात सरकारचा काहीही संबंध नाही, पुरस्कार परत करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही ते स्वीकारतो असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार परत करणा-या साहित्यिकांच्या विचारधारेवरही महेश शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. 'ते कोण आहेत, ते कोणत्या विचारधारेचे आहेत हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. यापूर्वीही दंगली झाल्यात मग त्यावेळी किती जणांनी पुरस्कार केले याकडेही शर्मांनी लक्ष वेधले.
कलबुर्गींच्या हत्येचा साहित्यिक निषेध दर्शवत आहेत, यात आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहे. पण हे प्रकरण राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेंतर्गत येते, जर त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांकडे गेले पाहिजे असे शर्मा यांनी स्पष्ट केले.