शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

वर्षानुवर्षे संसार, तरी पती-पत्नी करताहेत एकमेकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 9:39 AM

पाश्चात्त्य संस्कृती, पैसा नात्यांमध्ये कालवतोय विष; नव्या अहवालातून माहिती समोर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाश्चात्त्य संस्कृती, पैशाचा वाढता मोह, इंटरनेट आणि सोशल मीडियावरील वाढती अश्लीलता केवळ कुटुंबच नाही, तर पती-पत्नीच्या नात्यातही विष कालवत आहे. हे विष इतके प्राणघातक ठरते आहे की, वर्षानुवर्षे संसार सांभाळणारे पती-पत्नीही आता एकमेकांची फसवणूक करत आहेत. भारतासह आशियाई-युरोपीयन देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, प्रेमात धोका किंवा फसवणूक कोण

त्या ना कोणत्या प्रकारे वय, शारीरिक बदल, शिक्षण आणि मूल्यांशी संबंधित आहे. याकडे एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकत नाही.

या अभ्यासानुसार, अशा प्रकरणांमध्ये, सरासरी स्त्रिया लग्नाच्या सात वर्षांनंतर आपल्या पतीची फसवणूक करण्याचा विचार करू लागतात, तर पती तीन वर्षांनंतर फसवणूक करण्याचा विचार करू लागतात. डेटा एजन्सी बेडबायबल रिसर्च सेंटर २०२३ च्या अहवालानुसार, २३% लोक त्यांच्या साथीदारांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फसवत आहेत. १४% लोकांनी त्यांच्या सध्याच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे. यामध्ये २१% पुरुष आणि ७% महिलांचा समावेश आहे. 

 

पकडण्याची भीती तरीही...भारतासह आशियाई देशांबद्दल बोलायचे, तर १० पैकी ७ पुरुष आणि ६ महिला आपण पकडले न जाण्याची शक्यता असल्यास फसवणूक करण्यास तयार असतात. मात्र, यातील १७% लोक जोडीदाराकडून पकडले जातात. ६०% प्रकरणे जवळच्या मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत असतात.

१९ ते २९ वर्षांतील महिला अधिक धोकेबाज nभारतात सरासरी १९ ते २९ वर्षे वयोगटांतील महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक फसवणूक करतात. nया वयात ४०% महिलांनी जोडीदाराची फसवणूक केली, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. 

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा कुठे? इंडोनेशियाने विवाहबाह्य संबंध हा गुन्हा ठरविला आहे. सोमालिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स इत्यादी देशांमध्येही विवाहबाह्य संबंध ठेवल्यास शिक्षेची तरतूद आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्येही हे बेकायदा आहे. भारतात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात होता, परंतु २७ सप्टेंबर, २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी तो घटनाबाह्य ठरविला आहे. 

नेमकी कारणे काय आहेत? भारतात जोडीदाराची फसवणूक करण्याचे सर्वाधिक प्रमाण बेंगळुरूमध्ये आहे. त्यानंतर, मुंबई आणि कोलकाता शहराचा नंबर लागतो. ऑफिसात एकत्र काम करणे हे त्याचे मोठे कारण आहे. जोडीदाराने फसवणूक केली, तरी त्याला सुधारण्याची संधी भारतात ५५% दिली जाते. महिला पुरुषाला ही संधी ७०% देतात.

टॅग्स :marriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार