गांधीनगर : दीड वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा गुजरातेत ‘रूपाणी’राज सुरू झाले असून, विजय रूपाणी यांना सलग दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह १८ अन्य मंत्र्यांनीही या वेळी शपथ घेतली. गुजराती जनतेने, पटेल समाजाने दिलेल्या हादºयानंतर भाजपाने मंत्रिमंडळात पाटीदार आणि ओबीसींना समान वाटा दिला आहे.राज्य सचिवालयाजवळ झालेल्या या शानदार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवाय विविध पीठांचे महंतही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात रूपाणी, पटेल यांच्यासह ९ कॅबिनेट मंत्र्यांचा आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या वेळी रूपाणी यांनी नारंगी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. शपथग्रहणापूर्वी रूपाणी आणि पटेल यांनी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी रूपाणी आणि त्यांच्या पत्नी यांनी पंचदेव महादेव मंदिरात पूजा केली. या कार्यक्रमास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींची उपस्थिती होती.>असे आहे विजय रूपाणी यांचे मंत्रिमंडळएकूण ९ कॅबिनेट मंत्र्यांपैकी ५ मंत्री मागील सरकारमध्ये मंत्री होते. आज शपथ घेणाºया १० राज्यमंत्र्यांमध्ये ५ मागील सरकारमधील आहेत. यातील ६ मंत्री पटेल समुदायाचे आहेत. विभावरीबेन दवे या एकमेव महिला मंत्री आहेत.कॅबिनेट मंत्रीया कार्यक्रमात नितीन पटेल यांच्यासह कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये भूपेंद्र सिंह चुडास्मा, आर.सी. फालडू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गणपत सिंह वासवा, जयेश रादडिया, दिलीप ठाकोर आणि ईश्वर परमार यांचा समावेश आहे.>राज्यमंत्रीराज्यमंत्री म्हणून शपथ घेणाºयांत प्रदीपसिंह जडेजा, परबत पटेल, जयद्रथ सिंह परमार, रमन पाटकर, पुरुषोत्तम सोळंकी, ईश्वरसिंह पटेल, वासन अहिर, किशोर कानानी, बच्चूभाई खबाड आणि विभावरीबेन दवे यांचा समावेश आहे.
पुन्हा ‘रूपाणी’राज; मंत्रिमंडळात पाटीदार, ओबीसींना समान वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 4:06 AM