नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षातील देशभरात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली. परंतु कोर्टाने अद्याप ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारलेली नाही. ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी यापूर्वीच पॅरामीटर्स बनवले होते. त्यामुळे यूजीसीच्या नव्या निर्णयानंतर राज्य सरकार संतप्त झालं आहे.विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीसुद्धा आदित्य ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून युवा सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यास युवक काँग्रेसचा पाठिंबा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचंही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.
हेही वाचा
रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! वेटिंगची झंझट लवकरच संपणार अन् मिळणार फक्त कन्फर्म तिकीट
CoronaVirus : टेन्शन वाढलं! कोरोनावरच्या 'त्या' औषधांनी मोठा धोका; WHOचा गंभीर इशारा
लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप
रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं
जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...
उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल
टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश
मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही
इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर