शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वयाच्या ७३ व्या वर्षी आमदार उत्तीर्ण झाले एमएची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 9:14 AM

हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जजपा) आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे.

- बलवंत तक्षकचंदीगड : हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जजपा) आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना काळाचा सदुपयोग करून त्यांनी शिकण्याची इच्छा पूर्ण करून ८५ टक्के गुणांसह ते कुरुक्षेत्र विद्यापीठातून एम. ए. प्रथम वर्ष परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.त्यांनी घरूनच ऑनलाईनने परीक्षा दिली होती. तिसऱ्यांदा एम. ए. करणारे ईश्वर सिंह यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान एम. ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमासाठी बाह्य विद्यार्थी म्हणून कुरुक्षेत्र विद्यापीठात नोंदणी केली होती.घरीच अभ्यास करून त्यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यांनी या पूर्वीच लोकप्रशासन आणि इतिहासात एम. ए. केले आहे. एल.एल.बी आणि एल.एल.एमही त्यांनी केली आहे. १९७७ मध्ये २९ वर्षी आमदार झाल्यानंतर त्यांनी या पदव्या संपादित केल्या आहेत.राजकारणात येण्यापूर्वीच दहावी केल्यानंतर ते जेबीटी (ज्युनियर बेसिक ट्रेनिंग) अभ्यासक्रम केला होता. काही काळ ते शाळेत शिक्षकही होते.हरियाणा शालेय शिक्षण मंडळाचेही ते अध्यक्ष होते. त्यांनी सांगितले की, ४२ व्या वर्षी मी एल.एल.बी केले होते. सहा महिने कुरुक्षेत्रमध्ये वकिलीही केली. ते आजही कुरक्षेत्र वकील संघाचे सदस्य आहेत. हरियाणातून राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे चेअरमनही होते. माणसाने शिक्षणाची सुवर्णसंधी कधीही सोडू नये. यासाठी वयाचा कधीच विचार करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाEducationशिक्षणMLAआमदार