'पैशातून आनंद विकत घेता येतो का?' यावर वर्षानुवर्षे चाललेल्या चर्चेला अद्याप योग्य उत्तर मिळालेले नाही कारण या प्रश्नावर लोकांची भिन्न मते आहेत. याच दरम्यान, बंगळुरू येथील 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पैसे आणि एकटेपणाबद्दल सोशल मीडियावर एक नोट लिहिली आहे. तो सांगतो की तो वर्षाला 58 लाख रुपये कमावतो आणि तरीही एकटा आहे आणि हताश जीवन जगतो आहे.
आपली गोष्ट शेअर करताना त्याने लिहिले, "मला आयुष्यात खूप कंटाळा येत आहे. मी FAANG कंपनीत 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असून बंगळुरूमध्ये 2.9 वर्षांचा अनुभव आहे. मी 58 लाख कमावतो आणि काहीसे आरामात काम करतो. तथापि, मी माझ्या आयुष्यात नेहमीच एकटा असतो. माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी माझी एक मैत्रीण नाही आणि माझे इतर सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत."
"माझे कामकाजाचं जीवन देखील नीरस आहे कारण मी माझ्या करियरच्या सुरुवातीपासून एकाच कंपनीमध्ये आहे आणि दररोज मी त्यातच व्यस्त असतो. आता मी नवीन आव्हाने आणि कामाच्या वाढीच्या संधींची अपेक्षा करत नाही. कृपया माझे जीवन अधिक मनोरंजक बनवण्यासाठी मी काय करावे याबद्दल सल्ला द्या." त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपले मत मांडले आहे.
एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं की, “माझ्या काही मित्रांनी मला हेच सांगितले आणि मलाही ते अनेकदा जाणवले. एकटेपणा, कंटाळा, चिंताग्रस्त वाटणे." दुसर्या युजरने लिहिले, "संघर्ष खरा आहे." तिसऱ्याने लिहिले, "तो एकाकी आहे आणि ह्युमन कनेक्शन तळमळत आहे. आणि पगाराची पर्वा न करता या सर्व गोष्टी आता आवश्यक वाटतात. एकाकीपणा हा आधुनिक जीवनाचा शाप आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"