शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

मुदतीपूर्वीच आवळले रस्ते

By admin | Published: August 29, 2015 12:28 AM

पोलिसांशी हुज्जत : शहरवासीय त्रस्त

नाशिक : सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील, असे जाहीर करून नागरिकांना आश्वासित करणाऱ्या पोलीस यंत्रणेने आपल्याच घोषणेपासून पाठ फिरवत दुपारनंतर महत्त्वाचे रस्ते बॅरिकेडिंगने आवळण्यास सुरुवात केली, परिणामी सायंकाळच्या भरवशावर घराबाहेर पडलेल्या नोकरदारांशी अनेक ठिकाणी हुज्जतीचे प्रसंग घडले. आयुक्तांचे आदेश आम्हाला माहिती नाहीत, असे सांगून बंदोबस्तावरील पोलिसांनी नागरिकांना पिटाळून लावले. शनिवारच्या पर्वणी दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी रामकुंडाला केंद्रस्थानी मानून प्रमुख रस्ते व चौकात ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केले तसेच भाविक व प्रशासकीय मार्गावर वाहनांना बंदी घालून अन्य रस्त्यांवर प्रवेशबंदी जाहीर केली. पर्वणीच्या अगोदर चोवीस तास रस्ते बंद करण्याच्या पोलिसांच्या या कृतीवर तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आल्याने अखेर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते खुले राहतील, अशी घोषणा पोलीस आयुक्तांनी केली व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील दळणवळण व्यवस्था सुरुळीत असताना त्यानंतर मात्र पोलिसांनी ‘नो व्हेईलक झोन’मधील रस्ते आवळण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी ६ पर्यंत रस्ते खुले राहतील या पोलीस आयुक्तांच्या घोषणेचा त्यांना विसर पडून दुपारनंतर पंचवटी कारंजा, तपोवन क्रॉसिंग या ठिकाणचे रस्ते बंद करून टाकले. (प्रतिनिधी)