चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पंजाबमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड करण्यात आली आहे. अनेक मोबाईल टॉवरचा वीजपुवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी केबलचे बंडल जाळण्यात आले आहेत.कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. नव्या कृषी कायद्यांचा सर्वाधिक फायदा उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या कंपन्यांच्या साधनसंपत्तीला लक्ष्य करण्यात येत आहे.
पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड
By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 10:01 AM
Farmer Protest : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता.
ठळक मुद्देआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहेपंजाबमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोडअनेक मोबाईल टॉवरचा वीजपुवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी केबलचे बंडल जाळण्यात आले आहेत