नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून, या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.शेतकरी नेत्यांच्या बैठकीस उपस्थित असलेले स्वराज पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आज सकाळी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांची बैठक झाली. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काल रात्री गृहसचिवांनी पाठवलेल्या पत्रात कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी रस्ते रिकामी करून बुराडी येथे येण्याची अट घालण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ही अट फेटाळून लावली आहे. आमचा हेतू रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा नाही आहे. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशा परिस्थिती सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे योग्य नाही.
आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला
By बाळकृष्ण परब | Updated: November 29, 2020 15:15 IST
Farmer News : नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला
ठळक मुद्देदिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहेआता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार