नवी दिल्ली - अग्निपथ योजनेबाबतचा गैरसमज आता दूर करण्यात आला असून सैनिक होण्याची तयारी करणारे युवक ठिकठिकाणी शारीरिक कसरतीच्या सरावाला लागले आहेत, असे सशस्र दलाने मंगळवारी सांगितले. लष्करी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्ट. जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, भरती प्रक्रियेते बदल होणार नाही. लष्करातील पारंपरिक रेजिमेन्ट पद्धतही यापुढेही चालू राहिल.पत्रकार परिषदेत पुरी म्हणाले की, अग्निपथ योजना सरकारच्या अनेक विभागांशी केलेला विचारविनिमय आणि तीनही सशस्र दल तसेच संरक्षण मंत्रालयातंर्गत केलेल्या मसलतीची निष्पत्ती होय. ही सुधारणा गरजेची होती. १९८९ पासून विविध समित्यांनी याच धर्तीवर शिफारशीं केल्या होत्या. सर्व संबंधित योजनेला अंतिम स्वरुप देण्यात सहभागी होते. या योजनेचे समर्थन करतांना एका अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निपथ योजनेने कोणतेही नुकसान होणार नाही.
केंद्राचे कोर्टात कॅव्हिएटकेंद्राने सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केले असून अग्निपथ योजनेविरुद्ध दाखल याचिकांवर कोणताही आदेश देण्याआधी यावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अग्निपथ योजनेवर फेरविचार करण्यासंबंधी केंद्राला निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.