केंद्र सरकारची अग्निपथ योजना (Agneepath Scheme) सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या योजनेविरोधात गेल्या चार दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशातच ट्विटरवर एक व्हिडिओदेखील जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही आंदोलक दुकानातील सामानाची लूट करताना दिसत आहेत.
केवळ 45 सेकेंदांचा हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. "हे आपले भावी सैनिक (Soldiers) असूच शकत नाहीत. बिहारमधील रेल्वे स्थानकावरील दुकानातील लुटीचा व्हिडिओ," असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
दुकानांची लूट करताना दिसले लोक -ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक दुकानातून सामान लुटताना दिसत आहेत. खरे तर, अग्निपथ योजनेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. यातच बिहारच्या आंदोलकांनी राज्य बंदची घोषणाही दिली होती.
सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशातील अनेक राज्यांतून विरोध होत आहे. तरुणांमध्ये जबरदस्त आक्रोश दिसत आहे. बिहारनंतर आता राजस्थान, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणातही या योजनेचा विरोध वाढताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, अग्निपथ योजनेच्या माध्यमाने भर्ती केलेल्या एकूण जवानांपैकी 25 टक्के जवानांनाच सैन्यात नौकरी दिली जाणार आहे. यामुळेच विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
विरोधकही आक्रमक -एकीकडे सरकारच्या आपल्या या निर्णयाचे जोरदार कौतुक करताना दिसत आहे. तर विरोधक मात्र या मुद्द्यावरच मोर्चेबांधणी करण्याची तयारी करत आहेत. याच मुद्द्यावर काँग्रेस रविवारी सकाळी जंतरमंतरवर 'सत्याग्रह'ही करणार आहे.